जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहराचे अधिकृत उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. बुधवारी वैद्यकीय वर्गाकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ. अनुज पाटील यांच्या स्वागताला ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले, अनेक बहिणींच्या ओवाळणीतून कौटुंबिक प्रेम दिसलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवणारे नागरिकांचे डॉ. अनुज पाटील यांनी मानले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांचा आजचा प्रचार दौरा जळगाव शहराच्या विविध भागात काढण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, डॉ. लीना पाटील महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, चेतन पवार, श्रीकृष्ण मेंगळे, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, साजन पाटील, जितेंद्र पाटील, ललित शर्मा, आशुतोष जाधव यांच्यासह डॉ. अनुज पाटील यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. वैद्यकीय वर्गातील डॉ हर्षा पाटील, डॉ. सिद्धार्थ पाटील, डॉ. लीना पाटील, महेंद्र पाटील, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. अभिजित पाटील आणि डॉ. अजय सोनवणे यांनी डॉ. अनुज पाटील यांचे स्वागत केले. तसेच प्रचारात सहभाग घेतला.