• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनिल चौधरी साई बाबा चरणी लीन, विजयासाठी साकडे, प्रचाराला सुरुवात

रावेर-यावलच्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त होऊ द्या !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 6, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
अनिल चौधरी साई बाबा चरणी लीन, विजयासाठी साकडे, प्रचाराला सुरुवात

यावल/रावेर, दि.६ – रावेर-यावलच्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त होऊ द्या, माझ्या विजयाने मतदार संघाचा सर्वांगीण विकास होऊ द्या. जाती-पातीच्या भिंती गळून जनतेला सुख, शांती, समृद्धीचे दिवस येऊ द्या, असे साकडे रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी साईबाबांना घातले. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली ता.यावल येथे करण्यात आला.

मंदिराच्या पवित्र परिसरात, परिवर्तन महाशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी मांदियाळी जमली होती. माझ्या विजयासह जनतेला सुगीचे दिवस येऊ दे. परंपरागत कौटुंबिक वारसा दूर करून एक मजुराच्या मुलाच्या हातून जनतेची सेवा घडू दे असे साकडे अनिल चौधरी यांनी साईबाबांना घातले असून जनतेच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने प्रचंड मताधिक्याने माझा विजय होणार असल्याचा विश्वास परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अनिल चौधरी यांनी व्यक्त केला.

प्रसंगी फिरोज शेख, गणेश बोरसे, राम कुकडे, गोकुळ कोळी, कल्पेश खात्री खत्री, करीम मन्यार, भरत लिधुरे, विलास पांडे, बिलाल शेख, तुकाराम बारी, नंदकिशोर सोनवणे यांच्यासह अनेक जेष्ठ मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी उत्साहात अनिल चौधरी यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी अनिलभाऊ तुम आगे बढो, अनिलभाऊंचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मांदियाळी..
प्रचारात विकास पाटील, खेमचंद कोळी, सचिन झाल्टे, लतीफ खान, शुभम पाटील, सागर चौधरी, मनोज करंकाळ, दिलीप बंजारा, विनोद कोळी, अनिल चौधरी, अय्युब पहेलवान, मोहसीन शेख, विजय मिस्तरी, रवी महाजन, हाजी हकीम सेठ, राकेश भंगाळे, अनंत जोशी, बंटी मंडवाले, विक्की काकडे, सचिन कोळी, रमजान तडवी, रोनक तडवी, सुधाकर भिल्ल, सचिन महाजन, संतोष चौधरी, चेतन वायकोळे, गोलू मानकर यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व परिवर्तन महाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा

लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add