• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावकर रंगकर्मींतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस उत्साहात साजरा

बालगंधर्व नाट्यगृहात अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 5, 2024
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
जळगावकर रंगकर्मींतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस उत्साहात साजरा

जळगाव, (प्रतिनिधी) : मराठी थिएटर अर्थात ‘मराठी रंगभूमी’ला समृद्ध वारसा आहे. मराठी रंगभूमी म्हणजे प्रतिभा, सर्जनशीलता आणि सामाजिक बदल यांचा एक ठेवा आहे. म्हणूनच हा वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेच्या आयोजनात आज (दि.५) जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, अरुण सानप यांच्याहस्ते माल्यार्पण करुन नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले. त्यानंतर बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. अमोल ठाकूर, सचिन महाजन, दर्शन गुजराथी, मोहित पाटील यांच्यासह कलावंतांनी गण व नांदी म्हटली.

याप्रसंगी शहरातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे, प्रमुख कार्यवाह ॲड.पद्मनाभ देशपांडे, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.शमा सराफ, कार्यकारिणी सदस्य सुबोध सराफ, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, सोशल मिडीया प्रमुख मोहित पाटील आदींसह रंगकर्मी चिंतामण पाटील, अरुण सानप, जगदीश नेवे, सुहास दुसाने, अविनाश चव्हाण, दर्शन गुजराथी, मानसी नेवे, यश चौधरी, गायत्री ठाकूर, विशाखा सपकाळे, वैभव बाविस्कर आदी उपस्थित होते.

का साजरा केला जातो मराठी रंगभूमी दिवस?
१८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी ०५ नोव्हेंबर १८४३ साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. १९४३ साली या दिवसाच्या स्मरणार्थ या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा. सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून घोषित करण्यात आला होता.


 

Next Post
जळके-विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा भक्कम पाठिंबा

जळके-विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा भक्कम पाठिंबा

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add