• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ऋतिक कोल्हे वर एमपीडीए

नागपूर कारागृहात स्थानबद्ध ; नशिराबाद पोलीस स्टेशनची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 22, 2024
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ऋतिक कोल्हे वर एमपीडीए

जळगाव, (प्रतिनिधी) : विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असण्यासह स्थानबद्धतेचे आदेश असलेला योगेश उर्फ ऋतिक दिगंबर कोल्हे (३७, रा. आसोदा, ता. जळगाव) हा जिल्हा कारागृहातून बाहेर पडताच त्याला नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेत नागपूर कारागृहात रवानगी केली.

अनेक गुन्हे दाखल असलेला योगेश कोल्हे याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असण्यासह त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए.सी. मनोरे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले होते. तालुका पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात योगेश हा जिल्हा कारागृहात होता.

त्याचा जामीन मंजूर झाल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळताच पोउनि गणेश देशमुख, सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ शरद भालेराव, गिरीश शिंदे, सागर बिडे यांनी त्याला १५ ऑक्टोबर रोजी तो कारागृहातून बाहेर पडताच त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

Next Post
विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू

किटकनाशक प्राशन करून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group