• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे : आ.सुरेश भोळे

श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे प्रभू श्रीराम, भारत माता पूजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 13, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे : आ.सुरेश भोळे

जळगाव, (प्रतिनिधी) : आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे. भारत देशाची संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे अनेक देशांनी अनुकरण केले आहे. तसेच, भारतमातेचे पूजन व संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी शनिवारी दि. १२ रोजी केले. यावेळी त्यांनी विजयादशमीच्या जळगावकरांना सदिच्छा दिल्या.

जळगावचा राजा श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे प्रभू श्रीराम पूजन व भारत माता पूजन शनिवारी दि. १२ रोजी प्रशस्त महानगरपालिकेच्या इमारतीखाली करण्यात आले होते. कार्यक्रमात भवानी मंदिरचे महाराज महेश त्रिपाठी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसंच ध्वजाचे पूजन करण्यात आले. महाआरतीनंतर घोषणा देण्यात आली आणि दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.

श्री नेहरू चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय गांधी यांनी यशस्वी आयोजन केले. सूत्रसंचालन डॉ.अश्विनीकुमार काळुंखे यांनी केले. या कार्यक्रमात भवानी मंदिरचे महाराज महेश त्रिपाठी, तपस्वी हनुमान मंदिरचे महंत बालकदास महाराज, खा. स्मिताताई वाघ, शहराचे आ. राजूमामा भोळे, उद्योगपती श्रीराम पाटील, रोहित निकम, भाजपा महानगरअध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, माजी नगरसेवक अमित भाटिया, दीपक जोशी, आरएसएसचे महेश चौधरी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन विनोद बियानी, युवा सेना जिल्हाप्रमुख पियूष गांधी, राष्ट्रीय सेवा संघ संघाचे अनेक कार्यकर्ते, विविध मार्केटचे व्यापारी, पदाधिकारी तसेच मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #rajumama
Next Post
वीज कोसळल्याने वाहनांसह वस्तूंचे नुकसान ; जळगावची घटना

वीज कोसळल्याने वाहनांसह वस्तूंचे नुकसान ; जळगावची घटना

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add