• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अपघात ; तिघांचा मृत्यू

यावल-चोपडा रोडवरील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 8, 2024
in जळगाव जिल्हा
0
मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अपघात ; तिघांचा मृत्यू

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. तर कारचालक गंभीर जखमी असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी याठिकाणी नवरात्रीमध्ये दरवर्षी भंडारा देत असतात. त्यानुसार नवरात्री सुरु असल्याने ठरल्याप्रमाणे मंगळवारी ८ ऑक्टोंबर ला सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्या सोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी मार्गस्थ झाले होते. (केपी)मात्र मनुदेवी मंदिर काही किलोमीटर अंतरावर असतानाच त्यांच्या कारचा अपघात झाला.

या भीषण अपघातात वाणी बंधूसह जितेंद्र भोकरे हे तिघे जागीच मृत्युमुखी पडले तर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (केपी) अपघाची माहिती मिळतात यावल पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Tags: accident
Next Post
महिलेची सोन्याची पोत लंपास ; एकाला अटक

महिलेची सोन्याची पोत लंपास ; एकाला अटक

ताज्या बातम्या

जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका
खान्देश

जळगावात ‘रामानंद’ हद्दीत कुंटणखान्यावर छापा; दोन परप्रांतीयांसह ४ महिलांची सुटका

January 20, 2026
राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य
खान्देश

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य

January 19, 2026
जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत
खान्देश

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

January 19, 2026
जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषी

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

January 19, 2026
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

January 18, 2026
चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

January 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group