जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज सोमवारी आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांच्या हातातील हक्काचा रोजगार कमी होत चालला असून बेरोजगारी वाढत असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान राज्यसरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र महायुती सरकार स्थापन झाल्यापासून सरकारच्या दुर्लक्षित कारभाराने अनेक प्रकल्प व वर्षानुवर्ष कार्य गणित असलेले उद्योगधंदे बंद करून गुजरातला स्थलांतरित होत असल्याने या प्रकल्पात काम करीत असलेले अनेक कुशल कामगार व अधिकारी बेरोजगार झाले असल्याचे देखील सांगण्यात आले.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, महानगर अध्यक्ष रिकु चौधरी, युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, अरुण लक्ष्मण पाटील, संचालक उत्पन्न बाजार समिती, साहिल पटेल, चेतन पवार, आकाश हिवाळे, पंकज राजाराम तनपुरे, शांताराम ठाकूर, शिवराम बारी, प्रमोद सावळे, भूषण आनंदा पाटील, गोलू पवार, अमोल पाटील, हितेश जावळे, मतीन सय्यद व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.