मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : शहरातील नवीन गाव परिसरातील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय अभियंत्याचे डेंग्यूसदृश्य आजाराने गुरुवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढले असून अद्यापही धुरळणी अथवा फवारणी करण्यात आली नसल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे.

उमेश सुभाष झांबरे (वय ३२ वर्षे) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुभाष श्रीरंग झांबरे यांचे मोठे चिरंजीव होते. उमेश सुभाष झांबरे यांचं ०३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वा. १५ मिनिटांनी दुःखद निधन झाले. दरम्यान उमेश हे जळगाव येथे अभियंता म्हणून सुप्रीम पाईप कंपनीमध्ये कार्यरत होता. त्याची पत्नी मुक्ताईनगर येथील डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व एक लहान मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.











