जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दुचाकीचोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनने दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संशयितांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
भुषण रमेश झांबरे (रा. गाडेगाव ता. जामनेर) हे दि. १९ सप्टेंबर रोजी येथे कामानिमीत्त एच. एफ डीलक्स दुचाकी (एम.एच. १९ बी.एल ९३३४) ने निघाले होते. पुढे नाष्टा करण्यासाठी उमाळा बस स्टैंड येथे सदर मोटार सायकल लावुन रोडच्या दुस-या बाजुला नाष्टा करण्यासाठी गेले. (केपी) अवघ्या १५ मिनीटांत फिर्यादी यांची मोटार सायकल ही अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली होती. फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना बातमी मिळाली होती. उमाळा येथील व अजुन दोन मोटारसायकली हया कुसुंबा शिवारातील काही मुलांनी चोरी केल्या आहे.
म्हणून पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे गोपनीय बातमीदार नेमून सतत पाठपुरावा करुन संशयित पवन उर्फ भांजे गणेश पाटील वय (वय २२), निखील जयराम पाटील (वय २१ वर्ष दोन्ही रा. इंदीरानगर कुसुंबा ता. जि. जळगाव यांना ताब्यात घेतले. (केपी)त्यांची सखोल चौकशी करता त्यांनी उमाळा बसस्टैंड वरुन आणी अजुन दोन मोटारसायकली त्यात एक भुसावळ शहरातुन व दुसरी जळगाव शहरातुन चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना दि. २ रोजी अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रीमांड घेवुन रीमांड दरम्यान त्यांचेकडुन ३ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
सदर कारवाई ही मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोहेका दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे पोना किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, पोका. नितीन ठाकुर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललीत नारखेडे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना विकास सातदीवे हे करीत आहे.