• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेरच्या मंगळग्रह सेवा संस्थेला शासनाचा पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान

संस्थेला मिळाले चौथे आयएसओ मानांकन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 29, 2021
in धार्मिक
0
अमळनेरच्या मंगळग्रह सेवा संस्थेला शासनाचा पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान

गजानन पाटील | अमळनेर, दि 29 – येथील मंगळग्रह सेवा संस्थेला राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयातर्फे नुुुकताच पर्यटन दिनानिमित धार्मिक क्षेत्रात पर्यटन वाढीसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल शासनाचा ‘ पर्यटन मित्र ‘ हा पुरस्कार नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे देण्यात आला.

कोरोनामुळे मागील दिड वर्षांपासून सर्वच क्षेत्राला कमी – अधिक स्वरूपाचा आर्थिक फटका बसला आहे. त्याला पर्यटन क्षेत्रही अपवाद राहिले नाही. या पार्श्वभूमीवर पर्यटन वाढीला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी शासनामार्फत कृषी, धार्मिक, ऐतिहासक, सायकलिंग, ग्रामीण कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती संस्थाना पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, प्रादेशिक व्यवस्थापक MTDC जगदीश चव्हाण, पर्यटन संचालनालयचे उपसंचालक नितीनकुमार मुंडावरे, उपअभियंता ज्ञानेश्वर पवार, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे राजेंद्र बकरे, नितीन सोनवणे, जयेश तळेगावकर, रमेश पडवड आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारार्थी म्हणून मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी मनोगतात बोलताना, धार्मिक पर्यटनाचे स्वरूप, व्याप्ती व अर्थकारण विशद केले. मंगळग्रह मंदिराच्या धार्मिक पर्यटनाच्या नेत्रदीपक यशाचे गमकही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन.पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी.ए. सोनवणे तसेच कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट संजय पाटील सेवेकरी, आर.जे.पाटील, उमाकांत हिरे, राहुल पाटील, भूषण पाटील उपस्थित होते.

संस्थेला मिळाले चौथे आय एस ओ मानांकन

मंगळग्रह सेवा संस्थेला यापूर्वीच विविध प्रकारची तीन आय एस ओ मानांकने मिळाली आहेत. संस्थेने अन्न सुरक्षितता बाबत मिळविलेले चौथे मानांकन पोलीस आयुक्त दिलीप पांडे यांच्या हस्ते देण्यात आले. सदर पुरस्कार व चार आय एस ओ मानांकने मिळविणारी मंगळग्रह सेवा संस्था तथा मंगळग्रह मंदिर राज्यात एकमेव ठरल्याने सर्वांनीच कौतुक केले .दरम्यान अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे .

Next Post
हृदय विकार टाळण्यासाठी धूम्रपानापासून दूर रहावे.. -अधिष्ठाता डॉ.मिलिंद फुलपाटील

हृदय विकार टाळण्यासाठी धूम्रपानापासून दूर रहावे.. -अधिष्ठाता डॉ.मिलिंद फुलपाटील

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group