• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा महत्त्वाची.. – आ. राजूमामा भोळे

ए.टी. झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्तम संशोधन प्रकल्प सादर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 22, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा महत्त्वाची.. – आ. राजूमामा भोळे

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील ए.टी. झांबरे विद्यालयात डॉ. होमी भाभा संस्था मुंबईतर्फे आंतरविद्यालय विज्ञान प्रतिकृती स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी केले.

डॉ. होमी भाभा संस्था, मुंबई यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये जळगाव शहरातील विद्यालयांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या. यावेळेला आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. केसीई सोसायटीचे सहसचिव ऍड. प्रवीणचंद्र सोनार, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, सुनील कुलकर्णी, शास्त्रज्ञ डॉ. अस्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर आ. राजूमामा भोळे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रतिकृतींची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याची दाद दिली. विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकपणे आणि बुद्धी चातुर्याने विविध प्रकारच्या प्रतिकृती बनवल्या होत्या. काही प्रतिकृतींमध्ये तर टाकाऊ वस्तुपासून अत्यंत सुंदर असे प्रकल्प तयार केलेले दिसून आले. विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांकडून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सातत्याने वैज्ञानिक स्पर्धेमध्ये भाग घेत राहिले पाहिजे. त्यामुळे भविष्यात शास्त्रज्ञ होण्याची मोठी संधी आहे असे प्रतिकृती पाहताना आ. भोळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

Next Post
धक्कादायक : अमळनेर येथे महिलेचा निर्घृण खून

धक्कादायक : अमळनेर येथे महिलेचा निर्घृण खून

ताज्या बातम्या

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add