• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दरोडा : गुजरातच्या व्यापाऱ्याकडून साडेसहा लाखांचा ऐवज लुटला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 9, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

हेंकळवाडी येथील घटना ; ९ जणांवर गुन्हा

धुळे, (वृत्तसंस्था ) : कॉपर वायरच्या स्क्रैप खरेदीच्या बहाण्याने गुजरात राज्यातील बडोदा येथील व्यापाऱ्याला बोलावुन घेत त्याच्याकडील ६ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना हेंकळवाडी ता.धुळे, गावाजवळ घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात महिलेसह अज्ञात ९ जणांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात, कुणाल मनिलाल पटेल (३७) रा. आनंदबाग, सोसायटी, बडोदा गुजरात, यानी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नितीन भोसले नामक व्यक्तीने कॉपर वायरच्या स्क्रैप माल खरेदीचे अमिष दाखवून मालाची खात्री करण्याकरीता धुळे येथे बोलावून घेतले. त्यानुसार ते दि.५ रोजी सायंकाळी धुळ्यात आले. मात्र, संशयितांनी पूर्वनियोजित कट आखून मोटरसायकल (एमएच १८/ एयू-८२२६) वर दोन अज्ञात व्यक्तींना कुणाल पटेल यांना घेण्यासाठी पाठविले. ते वाहनातून मोटरसायकलसोबत जात असतांना सडगाव गावाच्या पुढे गेल्यावर हेंकळवाडी गावाजवळ अगोदरचे लपुन बसेलेल्या अनोळखी ६ ते ७ जणांनी त्यांना रस्त्यात गाठले.

एका अनोळखी महिलेने कुणाल पटेल व त्यांच्या साथीदारास वाहनातून बाहेर ओढले व हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील पाकीट, त्यातील पैसे, अंगावरील दागिने, अंगठ्या, ब्रेसलेट, गळ्यातील रुद्राक्ष माळ, सोन्याची रिंग, ४ मोबाईल हिसकावून घेतले. तसेच २ हजार रुपये अनोळखी व्यक्तीने त्यांच्या क्युआर कोडवर पेटीएमद्वारे ट्रान्सपर केले. असा एकूण ६ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटला. तसेच जिवेठार मारण्याची धमकी देवून संशयित पसार झाले. यावरुन अज्ञात ८ ते ९ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: Crimedhule
Next Post
पैशांची बॅग लांबविणारे ‘त्रिकुट’ अवघ्या दोन तासांत जेरबंद

पैशांची बॅग लांबविणारे 'त्रिकुट' अवघ्या दोन तासांत जेरबंद

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add