• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात नेमले जाणार योजनादूत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 8, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात नेमले जाणार योजनादूत

शहरी भागात 5 हजार लोकसंख्येमागे एक योजनादूत ; 13 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एका योजनादूताची निवड होणार आहे,असे एकूण 1606 योजना दूत नेमले जाणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर 13 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. 13 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

Tags: yojnadoot
Next Post
दीपिकाने दिला गोंडस मुलीला जन्म ; रणवीरचीही इच्छा झाली पूर्ण

दीपिकाने दिला गोंडस मुलीला जन्म ; रणवीरचीही इच्छा झाली पूर्ण

ताज्या बातम्या

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार
जळगाव जिल्हा

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

May 6, 2026
मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा
गुन्हे

मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा

May 6, 2026
भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी
गुन्हे

भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

May 6, 2026
सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

May 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 6, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

May 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group