• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

देशी दारूचे दुकान लुटून मद्यासह मुद्देमाल लांबविणारी टोळी गजाआड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव (प्रतिनिधी ) : तालुक्यातील नांद्रा बु. येथे देशी दारूचे दुकान मध्यरात्रीच्या सुमारास फोडून त्यातील ५३ हजार ७६० रुपयांची ७६८ देशी दारुच्या बाटल्या चोरुन नेल्याची घटना घडली होती.  या टोळीचा पोलिसांनी छडा लावला असून १० जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जळगाव तालुक्यातील नांद्रा बु. येथील देशी दारुच्या दुकानात चोरी करुन तेथून ५३ हजार रुपये किंमतीच्या ७६८ देशी दारुच्या बाटल्या, इन्वर्हटरची बॅटरी असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. पथकाने तपासचक्रे फिरवीत संशयित महेश उर्फ चिन्या भगवान सोनवणे, सागर अरुण सोनवणे, पवन कैलास सोनवणे, अश्विन जगन्नाथ सोनवणे, अजय भास्कर सपकाळे (सर्व रा. नांद्रा बु., ता. जळगाव), अजय गणेश न्हावी, कमलाकर प्रकाश कोळी (दोघ रा. रिधूर ता, जळगाव), सागर रविंद्र कोळी, निखील अनिल कोळी, जयेश प्रल्हाद कोळी (तिघ घार्डी, ता. जळगाव) यांना अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्या टोळीची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २८८ देशी दारुच्या बाटल्या व इन्वर्हटरची बॅटरी व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बापू पाटील, किरण आगोणे, दीपक चौधरी, पोलीस नाईक गणेश पाटील, मिलींद सपकाळे, तुषार जोशी यांच्या पथकाने केली.

Tags: CrimeJalgaon
Next Post
बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकाला दीड लाखांची लाच घेतांना अटक

बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकाला दीड लाखांची लाच घेतांना अटक

ताज्या बातम्या

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन
जळगाव जिल्हा

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन

October 2, 2026
गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे
खान्देश

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

October 2, 2026
अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव
Uncategorized

अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add