हेमंत पाटील | जळगाव, दि. 25 – जळगाव शहर महानगर पालिका आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जळगावात ‘हिरवाई’ प्रकल्पाचा शुभारंभ देवराई प्रकल्पाचे प्रमुख तथा सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
हिरवाई प्रकल्पा अंतर्गत शहरातील मेहरुण तलाव परिसरात 1001 वृक्षांची लागवड करण्यात येणार असून प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्य करणात भर पडणार आहे. यात करंज, वड, पिंपळ, कडुलिंब, आवळा, चिंच यासह विविध जातींच्या रोपांचा समावेश आहे.
वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या बाबतीत मराठी प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद असून आम्हाला प्रेरणा देणारे असल्याचे वक्तव्य करत “झाडांचे शतक, शतकासाठी झाडं” याच्यासाठी रोपवाटिका तयार होणार असल्याची माहिती सयाजी शिंदे यांनी बोलताना दिली.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन, नगरसेविका ॲडव्होकेट सुचिता हाडा, दीपमाला काळे, मराठी प्रतिष्ठान चे प्रवर्तक विजयकुमार वाणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, उद्योजक सुबोध चौधरी, नाट्यकलावंत शंभू पाटील आदींसह वृक्षप्रेमी उपस्थित होते.
पहा.. व्हिडिओ