• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरूणींच्या दहिहंडी महोत्सवाची जळगावकरांना अनुभूती

साहसाला तरुणींच्या उत्साहाची जोड...

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 28, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक, मनोरंजन
0
तरूणींच्या दहिहंडी महोत्सवाची जळगावकरांना अनुभूती

जळगाव दि. २७ (प्रतिनिधी) : गोविंदा रे गोपाला.. दहीहंडी फोड गोविंदा चा नामघोष.. प्रो लाईट अँड साऊंड शो रोषणाई तरुणींचे जल्लोषपूर्ण वातावरण… सोबत रोपमल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण.. ३११ ढोल-ताशा वादकांचा एकाच वेळी गजर.. श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी यंदाचा तरुणींचा दहीहंडी महोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडला. साहसी खेळांमध्ये तरुणींना प्रोत्साहन मिळावं यासाठी आयोजित तरुणींच्या दहीहंडी महोत्सवाचा दहीहंडी फोडण्याचा मान ही स्पर्धा न आयोजित करता सर्वांना आनंद मिळावा म्हणून यावेळेस सर्वांना देण्यात आला.

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींचा दहिहंडी महोत्सवाप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजुमामा), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित , कर्नल अभिजित महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, डॉ. भावना जैन, आशुली जैन, माजी महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ. अस्मिता पाटील, प्रतिभा शिंदे, पारस राका, अमर जैन, सुनील महाजन, शरद तायडे, स्वरूप लुंकड, डॉ. कल्याणी गुट्टे-नागुलकर, प्रिती अग्रवाल, राजेश चोरडीया, सपन झुनझुनवाला, सचिन नारळे, गजानन मालपूरे, युवाशक्ती फाउंडेशनचे विराज कावडीया व शहरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहभागी दहिहंडी पथकांसमवेत ढोल पथकातिल कलावंत, रिल्स स्टार व नृत्य कलावंतांना घडविणारांचा चषक देऊन गौरविण्यात आले.

ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे आतापर्यंतचे यश यावर विशेष थीम घेऊन यंदाचा दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानुसार संपूर्ण दहीहंडी महोत्सवाची सजावट व रचना करण्यात आली होती. संकल्पना राजेश नाईक यांची होती. क्रेनच्या सहाय्याने सहा दहिहंड्या उभारल्या होत्या. यात दहिहंडी फोडण्याचा मान सर्व सहा महिला गोविंदा पथकांनी घेतला.

या शाळेतील गोविंदा पथकाने घेतला सहभाग..
शहरातील नुतन मराठा महाविद्यालय, ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय एन. सी. सी., के. सी. ई. मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल शाळा, जी. एच. रायसोनी महाविद्यालय असे एकूण सहा महिलांचे गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. यामध्ये एकुण ४२३ तरूणींचा समावेश होता.

मल्लखांब व शौर्यवीर पथक आकर्षण..
तरुणींच्या दहीहंडी महोत्सवात शौर्यवीर व पेशवा ढोल-ताशा पथकाचे ३११ वादक एकाच वेळी वादन करत होते. त्यासोबतच प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २७ मुली मल्लखांब व रोपमल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक विवेकानंद व्यायाम शाळेचे विद्यार्थी करत होत्या. यासह प्रो लाईट अँड साऊंड शो, आधुनिक लाईट शोचे सादरीकरणाने तरुणींचा जल्लोष वाढविला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, जी एच रायसोनी स्कूल, किड्स गुरुकुल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमांसह ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन आणि जैन इरिगेशनच्या स्वयंसेवकांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे निवेदन अय्याज मोहसीन यांनी केले.

VIDEO 👇


 

Next Post
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

म्हशी चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 23, 2026
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला
महाराष्ट्र

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

July 23, 2026
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add