जळगाव, दि. 18 – कोरोनाला आळा घालण्यासाठी व रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक जळगाव येथे अनंत चतुर्थी, रविवार दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरगुती श्री गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे.
या ठिकाणी विसर्जन आरती करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. या सह युवाशक्तीचे ५० स्वयंसेवक, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे १५ पोलीस बांधव, वाहतूक पोलीस शाखेचे ३ कर्मचारी, पूजा विधी करण्यासाठी १ ब्राह्मण, निर्माल्य संकलन करण्यासाठी महानगरपालिकेचे ५ स्वच्छता दूत, ५ सजविलेले ट्रक, प्रसाद इत्यादी व्यवस्था करण्यात येणार आहे.
मागील वर्षी सुद्धा उपरोक्त संस्थेतर्फ़े याच प्रकारे सदर उपक्रम काव्यरत्नावली चौकात राबविण्यात आला होता, या मध्ये जळगाव शहरातील २५०० वर घरगुती श्री गणेश मूर्ती संकलित करून, मेहरूण तलावात विधीवत पणे विसर्जन करण्यात आले होते. याच प्रकारे यावर्षी सुद्धा घरगुती गणेश मुर्तीं संकलन करून विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. या उपक्रमाला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा पोलीस दल, जळगाव शहर महानगर पालिका, सार्वजनिक गणेशउत्सव महामंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, महापौर जयश्री महाजन , पोलीस निरीक्षक विजय शिंदे, इत्यादी मान्यवर सुद्धा या केंद्रावर आपली घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी अर्पण करणार आहेत. तरी जास्तीक जास्त नागरिकांनी कोरोनाला आला घालण्यासाठी सदर केदनरावर आपली घरगुती गणेश मूर्ती अर्पण करावी व या सर्व गणेश मुर्त्यांचे विधिवत विसर्जन आम्ही करू असे आव्हान आयोजकांनी केले आहे.