• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचालीचा मार्ग मोकळा

केंद्रीय जल आयोगाने दिली मान्यता

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 31, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचालीचा मार्ग मोकळा

जळगाव | दि. ३१ जुलै २०२४ | निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त होत नव्हती. मात्र, आता, धरणास आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. सन २०२२ पासुन धरणाचे प्रस्तंभांचे बांधकाम सुरु करण्यात आलेले आहे व आतापर्यंत सरासरी ११ मी उंची पर्यंतचे बांधकाम पुर्ण झालेले आहे.

जानेवारी २०२४ मध्ये एकूण प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालानुसार रु. ४८९० कोटी राज्य शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. या मान्यतेनुसार सद्यस्थितीत टप्पा १ अंतर्गत मुख्य धरणाचे काम पूर्ण करायचे असून १०.४ टीएमसी एवढ्या पाणी वापरासाठी भूसंपादन व पुनर्वसन करावयाचे आहे. जानेवारी २०२४ मध्ये मंजूर प्रशासकीय मान्यतेनुसार, पहिल्यांदाच प्रकल्पाच्या संपूर्ण २५६५७ हेक्टर लाभक्षेत्रावर उपसा सिंचन योजना शासनामार्फत करावयास मान्यता प्राप्त झाली आहे.

केंद्र शासनाकडुन धरणास निधी उपलब्ध होण्यासाठी प्रकल्पाच्या अद्यावत किमतीस केंद्रीय जल आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता आवश्यक होती, त्याअनुषंगाने मार्च २०२४ मध्ये प्रकल्पाच्या टप्पा १ करीता राज्य शासनाने वित्तीय सहमती दिली असून, रु. २८८८ कोटी एवढ्या टप्पा १ च्या किंमतीस केंद्रीय जल आयोगाची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच एप्रिल २०२४ मध्ये प्रकल्पाच्या टप्पा १ करीता जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडुन रु. २८८८ कोटीस गुंतवणुक मान्यता (Investment Clearance) प्राप्त झाली आहे. प्रकल्पास आवश्यक वन जमिनीसाठी केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मान्यता (Forest Clearance) देखील दि. २९ जुलै २०२४ रोजी प्राप्त झाली आहे. प्रकल्पास आवश्यक सर्व वैधानिक मान्यता प्राप्त झालेल्या आहेत.

आता, निम्न तापी प्रकल्प (टप्पा १) ला केंद्र शासनाकडुन निधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ठ करण्यासाठी, राज्य शासनाकडुन रु. २८८८ कोटी एवढ्या किंमतीचा प्रस्ताव जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार यांचेकडे सादर करण्यात आलेला आहे. या मान्यतेची पुढील कार्यवाही जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली येथे प्रगतीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Tags: Amalnerpadalsare
Next Post
जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

ताज्या बातम्या

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

January 18, 2026
एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!
खान्देश

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

January 18, 2026
जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी
खान्देश

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

January 18, 2026
“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group