जळगाव | दि.२५ जुलै २०२४ | शहरातील आकाशवाणी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली यात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे.
शेख रऊफ शेख अब्दुल्ला बेलदार (वय ६९) रा. आक्सा नगर, जळगाव असे मयताचे नाव असून ते दुचाकी क्रमांक (एम.एच. १९ बी.डी. २७५१) ने महाबळकडून जळगाव शहरात जात असतांना पाळधीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (आर.जे. ११ जी.बी. ७६४२) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार शेख रऊफ शेख अब्दुल्ला बेलदार यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक ताब्यात घेतला. यावेळी नागरीकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला.