• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खरीप हंगामात मका पिकावरील लष्कारीअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 17, 2024
in कृषी
0
खरीप हंगामात मका पिकावरील लष्कारीअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

जळगाव | दि.१७ जुलै २०२४ | जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव्र दिसुन येत आहे. कीड ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे, अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट Y आकाराची खूण असते व शरीराच्या शेवटून दुसऱ्या सेग्मेंट वर चौकोनी आकारात चार ठिपके दिसून येतात.

खरीप हंगामात मका पिकावरील लष्कारीळीचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात येण्यासाठी किडग्रस्त पिकांच्या शेताची खोल नांगरणी शक्यतो दिवसा करावी म्हणजे पक्षाद्वारे किडीच्या वेगवेगळ्या अवस्था नष्ट करण्यास मदत होईल. पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे व या किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा वापर करावा.

पिकावरील अंडीसमूह तसेच अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात. टेलेनोमस रेमस व ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांचे एकरी ५० हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर ४ ते ५ दिवसांपर्यंत रासायनिक किटकनाशकांची फवारणी करू नये. अॅझेडिरॅक्टीन १५०० पीपीएम किंवा निंबोळी अर्क ५ टक्के ५० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. न्युमोरिया रिलई किंवा मेटा-हायझियम अॅनीसोप्ली या जैविक किटकनाशकांची ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.

या किडीने ग्रस्त झालेली ५ टक्के झाडे आढळून आल्यास कार्बोफ्युरॉन ३ टक्के दाणेदार सीजी ३३ कि.ग्रॅ./हेक्टर किंवा फोरेट १० टक्के दाणेदार सीजी १० कि.ग्रॅ./हेक्टर ही किटकनाशके जमिनीत ओलावा असताना फेकीव पद्धतीने वापर करावा आणि दाणे जास्तीत जास्त पोंग्यामध्ये पडतील याची काळजी घ्यावी. डायमिथोयेट ३० टक्के ईसी १३ मि.ली. किंवा थायोमेथोक्झाम १२.६ टक्के लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड सी ३ मि.ली. किंवा क्लोरॅट्रॅलीनीप्रोल १८.५ टक्के एस सी ३ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी किटकनाशकांची करावी.

अधिक माहितीसाठी संपर्क कृषि सहाय्यक / कृषि पर्यवेक्षक / मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी टोल फ्री क्र.: १८०० २३३ ४००० वेब साईट: www.krishi.maharashtra.gov.in यावर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Next Post
जळगाव शहरामध्ये पिंक ऑटो रिक्षा असोसिएशनची स्थापना

जळगाव शहरामध्ये पिंक ऑटो रिक्षा असोसिएशनची स्थापना

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group