• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिरसोली रस्त्यावर कार अपघातात एक तरुण जागीच ठार ; तर तीन जखमी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 15, 2024
in जळगाव जिल्हा
0
शिरसोली रस्त्यावर कार अपघातात एक तरुण जागीच ठार ; तर तीन जखमी

जळगाव | दि.१५ जुलै २०२४ | मित्रांसोबत हॉटेलमधून जेवण करून घरी परतत असताना कारचा ताबा सुटल्याने कार थेट झाडावर आदळली. यात एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी १४ जुलै रोजी दुपारी चार वाजता घडली आहे. या अपघातात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आनंद शांताराम सोनवणे (वय-३९) रा. कासमवाडी जळगाव असे मयत झालेले तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ता आनंदा सोनवणे रविवारी १४ जुलै रोजी दुपारी मित्र भैरव भगवान राणे (वय ३३), प्रवीण उर्फ पप्पू आढाव (वय ३५), योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय ५५) सर्व राहणार कासमवाडी यांच्यासोबत कारने शिरसोली गावाजवळील एका हॉटेल मध्ये जेवणासाठी गेले होते. दरम्यान जेवण आटोपुन घरी येण्यासाठी निघाले असता दुपारी चार वाजेच्या सुमारास गुलाबराव देवकर कॉलेजच्या पुढे त्यांचे वाहन झाडावर धडकले. या भिषण अपघातात आनंद सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले तिघे जण गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर रस्त्याने जाणाऱ्या- येणाऱ्या वाहन चालकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान पोलीस कर्मचारी तसेच अपघातग्रस्तांच्या मित्र नातेवाईक घटनास्थळी तात्काळ पोहोचले. दरम्यान चौघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे आनंद सोनवणे यांना मयत घोषित करण्यात आले, तर उर्वरित तिघांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मयत आनंद सोनवणे यांच्या परीवाराने आक्रोश केला. यावेळी मित्रपरिवार व नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. समाजिक कार्य करणारे आनंद सोनवणे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, दोन मुलं असा परिवार आहे.

Next Post
खरीप हंगामात मका पिकावरील लष्कारीअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

खरीप हंगामात मका पिकावरील लष्कारीअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add