• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद

वयस्कर पुरुष एकेरी गटात जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिन यांना राष्ट्रीय विजेतेपद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 29, 2024
in क्रिडा
0
आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद

जळगाव, दि.२९ – निझामाबाद ( तेलंगाना ) येथे दि.२३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात साखळी फेरीत एअरपोर्ट अॅथोरिटी, सी.ए.जी., बी.एस.एन.एल. आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सिविल सेर्विसेसचा ३-० ने पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मात्र पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या संघाविरूध्द १-२ ने निसटता पराभव स्वीकारला व स्पर्धेतील उपविजेतेपद पटकाविले.

जैन इरिगेशनच्या महिला संघानेही उत्कृष्ठ अशी कामगिरी करतांना साखळी फेरीत बी.एस.एन.एल. आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत मात्र पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या संघाविरूध्द १-२ ने निसटता पराभूत होऊन चतुर्थ क्रमांक पटकावला. पुरुष एकेरी गटात जैन इरिगेशनच्या संदीप दिवेने अनेक नामवंत खेळाडूंचा पराभव करून ६ वा क्रमांक प्राप्त केला. ह्या गटात पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या योगेश परदेशीने अंतिम सामन्यात त्याच्याच संघाच्या के. श्रीनिवासचा सरळ दोन सेट मध्ये पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.

पुरुष वयस्करगटाच्या राष्ट्रीय एकेरी स्पर्धेत जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिन याने तेलंगाना आणि सिविल सेर्विसेसच्या खेळाडूंचा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य फेरीत कर्नाटकच्या के.ई. सुरेश कुमारचा व उपांत्यफेरीत तामिळनाडूच्या ई. महीमईराजचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या शांतीलाल जीतिया याचा २५-२० आणि १६-१३ असा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.

अंतिम सामना संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी अखिल भारतीय कैरम फेडेरेशनच्या महासचिव सौ.भारती नारायण, आंतरराष्ट्रीय कैरम महासंघाचे सचिव श्री. व्ही.डी.नारायण,तेलंगाना कैरम असो.चे सर्वश्री संतोषकुमार,नीरज संपथी, प्रविणकुमार जी, नव्याभारती ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका इंदिरा संतोषकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जैन इरिगेशनच्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन आणि प्रशासकीय क्रीडाधिकारी अरविंद देशपांडे व सर्व सहकार्यांनी आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व कैरम व क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले आहे.


 

Next Post
जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश व सचिव यांची जळगाव जिल्हा कारागृहास भेट

जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश व सचिव यांची जळगाव जिल्हा कारागृहास भेट

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 26, 2026
कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!
गुन्हे

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

August 26, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add