• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे निदर्शने

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 14, 2021
in आरोग्य
0
कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे निदर्शने

जळगाव, दि. 14 – कोरोना काळात कोविड-१९ बाधित रुग्णांची सेवा सुश्रुषा करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून निदर्शने करण्यात आले.

जगभरात कोरोना महामारीने उच्छाद मांडल्याने अत्यंत भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची भितीने लोक प्रतिनिधींनी देखील लोकांपासून स्वतःला दूर करून घेतले होते. अशा वेळी कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कंत्राटी स्वरूपात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, कक्ष सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार आदींनी जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णाची सेवा सूश्रुषा केली. मात्र या कोरोना योद्ध्यांना अचानक कमी करण्याचा अन्यायकारक निर्णय शासनाने घेतला. याचा निषेध व्यक्त करत कोविड काळात कोरोना रुग्णाची काळजी घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी कोरोना योद्ध्यांनी जनक्रांती मोर्चाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

दरम्यान कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाकडे भीतीपोटी जवळचे नातेवाईक सुध्दा जाण्यास घाबरत होते.अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णाची सेवा करणारे कंत्राटी कामगार हे जीवनदायी ठरले. या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची न्याय मागणी दुर्लक्षित झाल्यास महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा संपूर्ण राज्यभरात मोठे जनआंदोलन उभारेल व मंत्र्यांना रस्त्यावर पाय ठेवू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन संपताच कोरोना योद्धयांची बैठक पार पडली. यावेळी संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी कोरोना योद्धयांना मार्गदर्शन करून आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागांवर कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली.

यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगराध्यक्ष निलेश बोरा, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, दिलीप सपकाळे, फहीम पटेल, सुधाकर पाटील, संजय सपकाळे, चंद्रकांत नन्नवरे, वाल्मीक सपकाळे, यांच्या सह कुंदन माळी, भाग्यश्री चौधरी, मंदाकिनी विंचुरकर, ऐश्वर्या सपकाळे, प्रतिक्षा सोनवणे, नंदा पाटील, फरिदा तडवी, कोमल बिऱ्हाडे, रुकसाना तडवी, ललिता पवार, काजल वाघ, दिपाली भालेराव, आरती मोरे, हेमलता सरोदे, योगिता शिंदे, बापूसाहेब पाटील, धनसामल चव्हाण, सतीश सुर्वे मिलिंद तायडे, महेश खर्चाणे, जितेंद्र वाणी, इरफानोद्दीन शेख, युवराज सुरवाडे, प्रदीप पाटील, सतीश सोनवणे, देवानंद सोनवणे, रमेश वानखेडे, हर्षल देवकर, युगल जावळे, सागर चौधरी, अक्षय जगताप, नाना मगरे, साहेबराव वानखेडे, गौतम सोनवणे, रवींद्र पाटील, पवन शिरसाळे, कमलेश वाणी, जीवन चव्हाण, सतिष सूर्वे, अमोल बाविस्कर, प्रशांत कोळी, चंद्रशेखर पाटील, रामकृष्ण पाटील, प्रेमराज वानखेडे, रामकृष्ण शिंगरे, चेतन जाधव आदींचा आंदोलनात सहभाग होता.


 

Next Post
प्रगती विद्या मंदिरात ‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा

प्रगती विद्या मंदिरात 'बहुरंगी कौशल्य' उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group