भडगाव, दि.३० – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मतदारांना केले. करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केले.
रॅलीच्या सुरुवातीला शिवसेनेच्या ज्येष्ठनेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी त्यांच्या निवासस्थानी करणदादा पाटील यांचे औक्षण करून त्यांना शूभेच्छा दिल्या. त्यानंतर भडगाव शहारातील आझाद चौकातील प्रभु श्रीराम मंदिरात प्रार्थना करून आणि करणदादा पाटील, शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते संजय वाघ आदींच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर महादेव गल्ली, पवार वाडा, बालाजी गल्ली, महात्मा फुले चौक, श्री हनुमान चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौकमार्गे वैशाली सुर्यवंशी यांच्या कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान करणदादा पाटील यांच्या विजयचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
रॅलीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय वाघ, काँग्रेसचे याकूब खान पठाण, तालुकाध्यक्ष रतीलाल पाटील, युवक तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील, शहराध्यक्ष कमरअली पटवे, मोरसिंग राठोड, भूषण पाटील, नितीन तावडे, राष्ट्रवादीचे पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील, राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश परदेशी, शंकर मारवाडी, प्रल्हाद पाटील, जितन शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शामकांत भोसले, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील, योजना पाटील, रीना पाटील, रेखा पाटील, गायत्री बिरारी, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुरेश पाटील, संदीप पाटील, रामचंद्र निकम, जितेंद्र राजपूत, संतोष पाटील, सुनील पाटील, गोकुळ पाटील, शहराध्यक्ष शेरखां पठाण यांसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.