• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग

प्रचार रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 28, 2024
in राजकीय
0
मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग

जळगाव, दि.२८ – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून रविवार, दि.२८ रोजी जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसर, इंद्रप्रस्थनगर, श्री लक्ष्मीनगर, छत्रपती शिवाजी नगर, गेंदालाल मिल आदी भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. नागरिकांचा लाभलेला प्रतिसाद पाहून ही प्रचार रॅली विजयी रॅलीच वाटत होती. नागरिकांनी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घरा-घरांवरून फुलाची उधळण आणि ‘करणदादा पाटील यांचा विजय असो’च्या घोषणा देत करणदादा पाटील यांचे स्वागत केले.

जळगाव शहरातील राजमालतीनगरातील श्री हनुमान मंदिर आणि जिल्हा दूध संघासमोरील साईबाबा मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. राजमालती नगर, दूध फेडरेशन परिसर, महावीर नगर, राधाकृष्ण नगर, भारतनगर, इंद्रप्रस्थ नगर, श्री लक्ष्मी नगर, छत्रपती शिवाजी नगर, खडके चाळ मार्गे गेंदालाल मिल आदी भागातून प्रचार रॅली काढण्यात आली. त्यानंतर रेल्वे स्टेशनजवळील मौला अली मुश्किल कुशा बाबा दर्गा येथे प्रार्थना करून रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान, परिसरातील नागरिक, युवक, माता भगिनी यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघात ‘मशाल’ पेटवून करणदादा पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करू असा निर्धार केला. रॅलीदरम्यान, महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी, या भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले.

यावेळी माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, डेबुजी फोर्सचे अध्यक्ष सागर सपके, माजी नगरसेवक सुनील माळी, पार्वता भिल, प्रा. अस्मिता पाटील, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमृता नेरकर, शहराध्यक्ष दीपक माने, सचिव राजू निकम, उपाध्यक्ष सिमा बिर्ला, कोषाध्यक्ष सुनील निकम, सहसचिव सागर निकम, निर्मला निकम, शिवसेनेचे विभाग प्रमुख अण्णा भोईटे, ज्येष्ठ नेते सुभाष सांखला, निलेश मिश्रा, विजय कोळी, शरद बारी, रितेश बाविस्कर, माजी नगरसेवक इब्राहिम पटेल, शकील बागवान, गौरव वाणी, रहीम तडवी, गोकुळ चव्हाण, माजी नगरसेवक राजू मोरे, शहर उपाध्यक्ष किरण राजपूत, श्रीकांत आमले, नीता सांगोळे, छाया कोळी, योगिता शुक्ल, अमीना तडवी, मीना जावळे, सरिता नेरकर यांसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


Next Post
चाळीसगावच्या चव्हाण दाम्पत्याच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक

चाळीसगावच्या चव्हाण दाम्पत्याच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group