• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्रीराम पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे मलकापूर येथे उदघाटन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 26, 2024
in राजकीय
0
श्रीराम पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे मलकापूर येथे उदघाटन

मलकापूर, दि.२६ – रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश एकडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार एकडे यांनी श्रीराम पाटील यांना २५ हजाराची लीड देण्याचे आश्वासन दिले.

मागील काळात भारतीय जनता पार्टीला मलकापूर विधानसभा मतदारसंघातून ६२ हजाराची लीड दिला होता. परंतु कोणतेही विकास काम या मतदारसंघात त्यांच्याकडून झाले नाही. येणाऱ्या काळात केंद्राकडून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर श्रीराम पाटील सारख्या उमद्या उमेदवाराला आपल्याला विजयी करावे लागणार आहे असे आवाहन आमदार एकडे यांनी केले.

काँग्रेसचे नेते श्री कोलते म्हणाले, हा देश एकजूट राहावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. परंतु सत्ताधारी आपल्याच नशेत आहे. धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. या धर्मांधांना आपण वेळीच अटकाव करत त्यांचा पराभव करणे गरजेचे आहे. उमेदवार श्रीराम पाटील यांनी मलकापूर शहरात महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोष रायपुरे, जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, ऍड. साहेबराव मोरे, डॉ.अरविंद कोलते, माजी नगराध्यक्ष हाजीर अशी जमादार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान सेलकर , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष एस पी संभाले, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष विनिता गायकवाड, उमाकांत चौधरी, शिरीष डोरले, राजू पाटील, शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, शिवसेना (उबाठा) पक्षाचे गजानन ठोसर, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नारूशेठ नेहलाणी, श्याम राठी, राजू वाडेकर, प्राध्यापक खर्चे, आताउर रहमान जमादार, सनाउल्ला जमादार यासह मलकापूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Next Post
भविष्यात शेतीला उत्तम भवितव्य: विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात यावे – अशोक जैन

भविष्यात शेतीला उत्तम भवितव्य: विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात यावे - अशोक जैन

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add