• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिंपी प्रीमियर लीग सीजन-३चा दिव्य समारोप

आ. राजुमामा भोळे यांची विशेष उपस्थिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 13, 2024
in जळगाव जिल्हा
0
शिंपी प्रीमियर लीग सीजन-३चा दिव्य समारोप

जळगाव, दि.१३ – श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक मंडळातर्फे आयोजित शिंपी प्रीमियर लीग सीजन थ्री चा भव्यदिव्य असा समारोप मंगळवारी झाला. यावेळी आमदार सुरेश भोळे (राजु मामा) यांची विशेष उपस्थिती होती. दरम्यान समाज संघटन व भावी क्रिकेट प्लेयर आपल्या मिळेल, अशा भावना व्यक्त करत उत्कृष्ट नियोजनासाठी युवक मंडळाचे कौतुक आ. भोळे यांनी कार्यक्रमा प्रसंगी केले.

दिनांक ७ ते १० मार्च रोजी मानराज पार्क, जळगाव येथे शिंपी प्रीमियर लीग सीजन ३ चे आयोजक करण्यात आलेले होते. सीजन ३चा शिंपी डायनामाईट हा संघ विजेता ठरला. याचे संघमालक संदीप सोनवणे व कर्णधार विकी जगताप व प्रतिनिधित्व सुमित अहिरराव यांनी केले. या स्पर्धेत एकूण पुरूषांच्या १४ पुरुष व महिलांचे ३ संघांनी सहभाग घेतला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील मालेगाव, धुळे, चोपडा, मुंबई, पुणे, दोंडाईचा येथील संघांचा समावेश होता. क्रिकेटच्या माध्यमातून समाजाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, शिंपी समाज जिल्हाध्यक्ष बंडूनाना शिंपी, विश्वस्त पी. टी. शिंपी, रूपेश बागुल, तुषार शिंपी, प्रमोद शिंपी, मनीलाल शिंपी, संजय कापुरे, रविकिरणज कोंबडे, माजी नगरसेवक आबा कापसे, अनिल खैरनार, प्रदीप शिंपी, मनोज भंडारकर, सुरेश सोनवणे, उमेश शिंपी, गणेश सोनवणे हे होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जितेंद्र शिंपी, सुमित अहिरराव, हेमंत शिंपी, योगेश दगडू शिंपी, गणेश सोनवणे, अमित मुळतकर, निलेश शिंदे, यशवंत शिंपी, महेश शिंपी, विशाल देवरे, निलेश चव्हाण, सागर शिंपी, धर्मेंद्र जगताप, हर्षल बोरसे, हर्षल शिंपी, उल्हास देवरे, सागर देवरे, ऋषिकेश शिंपी, अशोक सोनवणे, दर्शन देवरे आदींनी परिश्रम घेतले व सूत्रसंचालन सचिन जाधव व आभार प्रदर्शन योगेश शिंपी यांनी केले.

Next Post
परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सवाचे जळगावात आयोजन

परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सवाचे जळगावात आयोजन

ताज्या बातम्या

कानाचा साधा संसर्ग समजू नका; डोकेदुखी ठरली दुर्मिळ आजाराचे लक्षण! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार
आरोग्य

कानाचा साधा संसर्ग समजू नका; डोकेदुखी ठरली दुर्मिळ आजाराचे लक्षण! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार

May 28, 2026
महादेव हॉस्पिटल येथे अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभागाची सुविधा
आरोग्य

महादेव हॉस्पिटल येथे अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभागाची सुविधा

May 28, 2026
महापालिकेतर्फे वजनकाटा बसवण्यात भ्रष्टाचार; उपमहापौर मनोज चौधरींचा खळबळजनक आरोप
जळगाव जिल्हा

महापालिकेतर्फे वजनकाटा बसवण्यात भ्रष्टाचार; उपमहापौर मनोज चौधरींचा खळबळजनक आरोप

May 27, 2026
जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

May 26, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा
जळगाव जिल्हा

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 26, 2026
तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला ‘अन्न व औषध प्रशासन’ आयुक्तपदाचा कार्यभार
महाराष्ट्र

तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला ‘अन्न व औषध प्रशासन’ आयुक्तपदाचा कार्यभार

May 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group