लालसिंग पाटील | भडगाव, दि.11 – तालुक्यात अतीवुष्टी झाल्या मुळे शेतकऱ्याच्या शेतीमलाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी नुकसानीची पाहणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली. दरम्यान कजगावात थेट बांधावर जात अतिवृर्ष्टि झालेल्या पीक परिस्थितीची व नुकसानीची पाहणी करत आढावा घेतला. तसेच शेतकऱ्याशी चर्चा करून लवकरात लवकर मदत मिळवुन देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी कजगाव ग्राम पंचयात वतीने सरपंच पती दिनेश पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच शेतकऱ्यांंना तात्काळ नुकशान भरपाई द्यावी अशी मागणी केली. यावेळी डॉ. सजंय पाटील, रतीलाल पाटील, कामगार आघडीचे विनोद हीरे, भूषण शिनकर, रवी पाटील, धर्येशील पाटील आदींसह शेतकरी बांधव निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
दरम्यान कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासोबत नुकसानीची पाहणी करताना आमदार किशोर पाटील, भड़गावचे तहसीलदार सागर ढवळे, बी.डी.ओ. वाघ, नायब तहसिलदार देवकर, उपविभागी अधिकारी कुषी अधिकारी पाचोरा नैनवाड, मंडळ कृषी अधिकारी ज्योती कडू, कृषी पर्यवेक्षक धनंजय पाटील तसेच कृषी विभागाचे कृषी अधिकारी उपस्थित होते.
पहा.. व्हिडिओ