जळगाव, दि.२४ – शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगद्याजवळ एक संशयीत ईसम पिस्तुल बाळगत फिरत होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला एकास ताब्यात घेतले.
संबंधित व्यक्तीचे नाव किशोर रामदास कोळी (वय ३०) रा. कांचन नगर ता. जि. जळगाव असून तो व्यवसायाने बिगारी काम करीत असल्याचे समोर आले. त्याच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलच्या शिट खाली अंदाजे १,३१,००० रु कींमतीचे एकुण ०३ गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगझीन सह व एकुण ०४ जिवत काडतुस मिळून आले. दरम्यान मुद्देमालासह किशोर कोळी यास ताब्यात घेण्यात आले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सपोनी मोरे करीत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदिप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनी अमोल मारे, पोउनि गणेश वाघमारे पोउनि. गणेश चौभे, विजयसिग पाटील, विजय पाटील, साचिन महाजन, अक्रम शेख, महेश महाजन, कीरण चोधरी, सुधाकर आभोरे, प्रितम पाटील ईश्वर पाटील, मपो प्रियंका कोळी यांनी ही कामगीरी केली.