• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चालविली ई-रिक्षा

मराठी प्रतिष्ठानतर्फे महिलांना ई रिक्षा वितरण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 21, 2024
in जळगाव जिल्हा
0
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चालविली ई-रिक्षा

जळगाव, दि.२१ – मराठी प्रतिष्ठानतर्फे महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून त्यांना रिक्षा तसेच ई- रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय बँकेच्या माध्यमातून रिक्षा उपलब्ध करण्यास मदत देखील करण्यात येत आहे. दरम्यान जळगाव शहरातील दोन महिलांना जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या हस्ते ई रिक्षा वितरित करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः ई रिक्षा चालवत लाभार्थी दोन्ही महिलांना रिक्षात बसवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात फेरफटका मारला व महिलांना शुभेच्छा दिल्या. मराठी प्रतिष्ठान मार्फत महिलांना ई रिक्षा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले व शहरांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी ई रिक्षा घ्याव्या व आत्मनिर्भर व्हावे असे सांगितले. इ रिक्षेमुळे प्रदूषण कमी होईल व पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

याप्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे, विश्वस्त डॉ. सविता नंदनवार, निलोफर देशपांडे, ललित शर्मा, सतीश सैंदाणे, प्रकाश जोशी, नूर मोहम्मद शेख व महिला ई रिक्षा चालक रोशनी सावळे, हर्षला गुरव उपस्थित होते. मराठी प्रतिष्ठान तर्फे शहरांमधील ५० महिलांना ई रिक्षाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून शासकीय बँकांमधून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे यांनी दिली.

Next Post
दिल्लीत केंद्रीय जल आयोगास मंत्री अनिल पाटील यांची भेट

दिल्लीत केंद्रीय जल आयोगास मंत्री अनिल पाटील यांची भेट

ताज्या बातम्या

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार
जळगाव जिल्हा

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार

August 3, 2026
बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

August 3, 2026
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add