जळगाव, दि. ०९- गडचिरोली येथे झालेल्या पोलीस दलाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने, आदिवासी समाजाच्या विकास व सन्मानास्तव जिल्हास्तरीय गडचिरोली महा मॅरेथोन- सिझन २ स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. पोलीस दलातर्फे झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्हा भरातील अतिदुर्गम भागातील समाजाच्या सर्वच स्तरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुमारे १४ हजार आबालवृद्ध धावपटू यात सहभागी झाले. ऐतिहासिक ठरलेल्या या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल जळगावच्या प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाच्या या अभूतपूर्व यशात जळगावातील जाहिरात संस्था प्रचिती मीडियाचा ‘सिंहाचा वाटा आहे. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी प्रचिती मीडिया यांच्याकडे सोपविण्यात आली होती . प्रचिती मीडियाने हे आव्हान यशस्वी रित्या पेलले. या मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनात प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे व त्यांच्या टीमने स्वतःला झोकून देत कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम, खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार देवराव होली, आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजभिये, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यतिश देशमुख, एम. रमेश आदींसह मान्यवरद उपस्थित होते.