• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवा शेतकऱ्यांमध्ये शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद.. – कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम

कृषी आयुक्तांनी तालुक्यातील शेती पीक क्षेत्र व प्रकल्पांना दिल्या भेटी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 2, 2023
in कृषी
0
युवा शेतकऱ्यांमध्ये शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद.. – कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम

जळगाव, दि.०२ – शेतकऱ्यांनी शेतीत कृषी संलग्न व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करावा. युवकांनी शेतीकडे उद्योग – व्यवसाय म्हणून पाहिल्यास शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद युवकांमध्ये असल्याचे प्रतिपादन कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी शुक्रवारी केले. जळगाव तालुक्यातील शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रक्षेत्रांना कृषी आयुक्तांनी भेटी दिल्या त्यावेळी ते बोलत होते.

सावखेडा खुर्द शिवारातील श्रीमती सुशिलाबाई आत्माराम साळुंखे यांच्या शेतातील निर्यातक्षम केळी उत्पादन, तसेच त्यांनी बी.आय. (बड इंजेक्शन) तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन केलेल्य केळी पीक प्रक्षेत्रास भेट देऊन तांत्रिक व कमी खर्चाचे तंत्रज्ञान याबाबतची माहिती यावेळी कृषी आयुक्त डॉ .गेडाम यांनी जाणून घेतली.

कृषी आयुक्तांनी यावेळी मौजे करंज शिवारातील धोंडीराम सपकाळे यांनी लागवड केलेल्या नवीन कांदे बाग प्रक्षेत्रास टिश्यू कल्चर तंत्रज्ञान व पारंपारिक कंद लागवड या बाबत उत्पन्नात होत असलेले फरक, वेळेची बचत आदी बाबत चर्चा केली. मौजे कानळदा कृषी यांत्रिकीकरण उपभियान योजने अंतर्गत श्रीमती आशाताई अशोक राणे यांनी खरेदी केलेल्या हार्वेस्टर या यंत्राची पाहणी करून माहिती जाणून घेतली. तसेच याच ठिकाणी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत गोपाल सपकाळे यांनी उभारलेल्या सद्गुरु केळी प्रक्रिया उद्योग येथे भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी उपस्थित असलेल्या युवा शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना युवकांनी कृषी संलग्न व्यवसायासोबतच अन्न प्रक्रिया उद्योग व कृषी निर्यातीत आपले भवितव्य घडवल्यास शेती क्षेत्रात निश्चितचपणे परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी डॉ.प्रविण गेडाम यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी युवकांनी देखील पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या प्रक्षेत्र भेटीवेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी, तंत्र अधिकारी दिपक ठाकुर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे, मंडळ कृषी अधिकारी अमित भामरे, कृषी पर्यवेक्षक डी.डी. सोनवणे, योगेश अत्रे, राहुल साळुंखे, प्रविण सोनवणे, भरत पाटील, कमलेश पवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सोनू कापसे, विवेक चव्हाण व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कृषीभूषण अनिल सपकाळे, मोहनचंद सोनवणे, राजेंद्र पाटील, ॲड.हर्षल चौधरी, किशोर पाटील, प्रदिप पाटील, डॉ.सत्वशील जाधव,संजय पाटील, संजय सपकाळे, किरण साळुंखे व शेतकरी उपस्थित होते.


 

Next Post
बहिणाबाईंने कर्तृत्वास स्थान दिले.. – साहित्यिक वा.ना. आंधळे

बहिणाबाईंने कर्तृत्वास स्थान दिले.. - साहित्यिक वा.ना. आंधळे

ताज्या बातम्या

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे बंडखोरांना ‘अल्टिमेटम’; दोन दिवसांत माघार न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा
खान्देश

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे बंडखोरांना ‘अल्टिमेटम’; दोन दिवसांत माघार न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा

January 7, 2026
प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका
खान्देश

प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका

January 7, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा प्रभाग १३ मध्ये मतदारांच्या भेटीगाठींवर दिला भर
खान्देश

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा प्रभाग १३ मध्ये मतदारांच्या भेटीगाठींवर दिला भर

January 7, 2026
बंडखोरांना जनता थारा देणार नाही; घराणेशाहीवर मुख्यमंत्र्यांचे जळगावात मोठे विधान
खान्देश

बंडखोरांना जनता थारा देणार नाही; घराणेशाहीवर मुख्यमंत्र्यांचे जळगावात मोठे विधान

January 6, 2026
शिवसेनेचे (उबाठा) जोरदार शक्तीप्रदर्शन; कुलभूषण पाटील व उज्वला पाटील यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

शिवसेनेचे (उबाठा) जोरदार शक्तीप्रदर्शन; कुलभूषण पाटील व उज्वला पाटील यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 6, 2026
भाजप उमेदवारांच्या रॅलीला प्रभाग ७ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडून विजयाचा निर्धार
खान्देश

भाजप उमेदवारांच्या रॅलीला प्रभाग ७ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडून विजयाचा निर्धार

January 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group