• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत मंजूर दवाखाने तातडीने सुरू करण्यासाठी मनसेचे निवेदन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 1, 2023
in जळगाव जिल्हा
0
‘आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत मंजूर दवाखाने तातडीने सुरू करण्यासाठी मनसेचे निवेदन

जळगाव, दि.०१ – साधारण एक वर्षापुर्वी जळगाव महानगरपालीकेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत शहरात १७ ठिकाणी दवाखाने सुरू करण्याबाबत महासभेत ठराव केला आहे. त्यामधील एकमेव दवाखाना शिव कॉलनीत सुरू झाला असुन उर्वरीत १६ दवाखाने तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शहरातील नागरीक आरोग्याच्या लाभाशी संबंधित हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना अतिशय उत्तम असुन त्यामुळे गोरगरीब रुग्णांना लाभ होणार आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनाचे या संदर्भात दुर्लक्ष होत असल्यामुळे चांगल्या योजनेचा खोळंबा होत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

कर्मचारी वर्गाची भरती..
दवाखान्याकरीता एक वर्षापुर्वी २४ आरोग्य सेवकांची परीक्षेद्वारा निवड करण्यात आली असुन आठ परीचारीकेची देखील निवड केली आहे. त्यामुळे हे सर्व कामाची प्रतिक्षा करीत आहेत. शासनाने प्रत्येक दवाखान्याकरीता निधी उपलब्ध करून दिला असुन दवाखाने सुरू न झाल्यास ३१ मार्च २०२४ नंतर सदर निधी परत जावु शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी ॲड. जयप्रकाश बाविस्कर (मनसे नेते), जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे, ललित शर्मा, सतीश सैंदाणे, चेतन पवार, मनविसे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, श्रीकृष्ण मेंगडे, संतोष पाटील, प्रकाश जोशी, विकास पाथरे, प्रकाश बाविस्कर, राजू डोंगरे, यश कुमावत उपस्थित होते.

Next Post
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमीत्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमीत्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघडकीस; यावल पोलिसांनी खुनाचा छडा लावून ३ आरोपींना केले जेरबंद!
गुन्हे

अपघाताचा बनाव उघडकीस; यावल पोलिसांनी खुनाचा छडा लावून ३ आरोपींना केले जेरबंद!

June 21, 2026
जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला नियमित योगा, व्यसनमुक्तीचा संकल्प
आरोग्य

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला नियमित योगा, व्यसनमुक्तीचा संकल्प

June 21, 2026
गुजरातधून चोरी झालेली कार जळगावात जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
गुन्हे

गुजरातधून चोरी झालेली कार जळगावात जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

June 21, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!
जळगाव जिल्हा

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

June 20, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन
आरोग्य

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

June 20, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन
जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन

June 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group