जळगाव, दि.२१ – येथील निवृत्तीनगर मधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदीर दि.२६ नोव्हेंबर रोजी खुले करण्यात येणार आहे. दरम्यान कार्तिका पोर्णिमा सूरू होत असल्याने तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते.
या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीरे असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात. अभिषेक व पूजेसाठी गुरूजीसह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून कार्तिकी पौर्णिमा उत्सवाची तयारीला देखील सूरूवात करण्यात आली आहे.
कार्तिक नक्षत्र सकाळी ११ वाजुन १० मिनिटानी सुरू होत असून दु.३ वाजुन ५३ मि. कार्तिक पौर्णिमा सूरू होत आहे. २७ नोव्हेंबर रोजी दु. २ वाजुन १५ मि. समाप्ती होणार आहे. मंदिर दर्शनासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत खुले राहणार असून जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.