• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 10, 2023
in जळगाव जिल्हा
0
चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट

जळगाव, दि. १० – कला व संस्कृती संचालनालय गोवा, व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट या प्रातःकालीन मैफिलीचे आयोजन बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला म्हणजे मंगळवारी १४ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही प्रातःकालीन सभा महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या मैफिलीस कै. नथू शेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. पाडवा पहाट या प्रातःकालीन सभेचे यंदाचे हे २२ वे पुष्प प्रतिष्ठान गुंफत असून गोव्याच्या सांस्कृतिक भूमितुन दोन युवा कलावंतांना प्रतिष्ठान जळगावकर रसिकांसमोर सादर करणार आहेत.

या वर्षी मुग्धा गावकर व प्राची जठार या दोन प्रतिभा संपन्न युवती आपली कला जळगावकर रसिकांसमोर सादर करणार आहेत. या दोन स्वरसखींना साथ संगत करणार आहेत ऋषिकेश फडके (तबला) दत्तराज सुरलकर (संवादिनी) पंकज सायनेकर (बासरी) तर निवेदन आकाशवाणी पणजीच्या उद्घोषिका मानसी वाळवे या करणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नथू शेठ चांदसरकर ट्रस्टचे अध्यक्ष मेजर नाना वाणी असतील. चुकवू नये अशा या प्रातःकालिन मैफिलीसाठी सर्व जळगावकर रसिकांनी यावे व या मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन सगुण वेळिप, (संचालक, कला व संस्कृती संचालनालय) अशोक परब (उपसंचालक), सिद्धार्थ गायतोंडे (सांस्कृतिक विभाग प्रमुख) गोवा सरकार तसेच स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
युवक काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हा प्रवक्ते पदी फैजान शाह यांची निवड

युवक काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हा प्रवक्ते पदी फैजान शाह यांची निवड

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add