• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी

विशेष मोहीमेत ३६ गुन्हे, ३५ आरोपींना अटक व ८ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 5, 2023
in जळगाव जिल्हा
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी

जळगाव, दि.०५ – जळगाव जिल्हाधिकारी पदाचा आयुष प्रसाद यांनी कार्यभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील अवैध मद्य विक्रीवर मोहीम राबविण्याच्या उत्पादन शुल्क विभागास सूचना दिल्या. या सूचनांनुसार उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात धडाडीने काम करत एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या सात महिन्यात १३१८ गुन्हे नोंदवत २ कोटी २५ लाख ८० हजार २३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील वर्षाच्या सात महिन्याच्या तुलनेत गुन्हे दाखल करण्याच्या प्रमाणात २२ टक्के वाढ झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन यांच्या नेतृत्वाखाली उत्पादन शुल्क विभागाने ही कामगिरी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने मागील वर्षी एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्याच्या कालावधीत १०८३ गुन्हे नोंदवत १ कोटी ६७ लाख २० हजार ५०२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावर्षीच्या एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ च्या सात महिन्यांत ५८ लाख ५९ हजार ७३३ रूपयांचा मुद्देमाल वाढीव मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुद्देमाल जप्तीत ३५ टक्केवाढ झाली आहे. मागील वर्षाच्या सात महिन्याच्या तुलनेत यावर्षी जप्त वाहने, कलम ९३, एमपीएडीए व बंधपत्र यामधील कारवाईत अनुक्रमे ६१ टक्के, १६०‌ टक्के, १०० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांच्या विशेष मोहीमेत ३६ गुन्हे, ३५ आरोपींना अटक व ८ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त..
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जळगाव जिल्ह्यात ३ व ४ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी छापेमारी करत ३६ गुन्हे नोंदवून ३५ आरोपींना अटक केली. या छापेमारी मध्ये ८ लाख २१ हजार ६४५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रसायन – ८०६० लीटर, गावठी दारू – ७२८.५ लीटर, देशी दारू – २२६.९ लीटर, विदेशी मद्य – २३.४ लीटर, बियर- ३९ लीटर वाहने – ४ (१ चारचाकी व ३ दुचाकी) जप्त करण्यात आली आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध मद्य विक्रीवरील कारवाईचे सत्र आगामी काळात ही चालूच राहणार आहे. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

Next Post
३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा, महाराष्ट्राच्या तायक्वॉदो खेळाडूंनी जिंकली १० पदके

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा, महाराष्ट्राच्या तायक्वॉदो खेळाडूंनी जिंकली १० पदके

ताज्या बातम्या

मोटारसायकल चोर धुळ्यातून जेरबंद! जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३ मोटारसायकली जप्त
खान्देश

मोटारसायकल चोर धुळ्यातून जेरबंद! जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३ मोटारसायकली जप्त

November 15, 2025
सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन
खान्देश

सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

November 15, 2025
मनीषा चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी निवड
खान्देश

मनीषा चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी निवड

November 14, 2025
जळगावात बालकलावंतांसाठी ‘जल्लोष लोककलेचा’ कार्यक्रमाचे २८ व २९ नोव्हेंबर आयोजन
खान्देश

जळगावात बालकलावंतांसाठी ‘जल्लोष लोककलेचा’ कार्यक्रमाचे २८ व २९ नोव्हेंबर आयोजन

November 14, 2025
भडगावमधील त्या अल्पवयीन मुलींना राजस्थानमधून सुखरूप सोडवले! ०३ तरुण ताब्यात
खान्देश

भडगावमधील त्या अल्पवयीन मुलींना राजस्थानमधून सुखरूप सोडवले! ०३ तरुण ताब्यात

November 14, 2025
रस्त्या लुट करणाऱ्या आरोपींना धरणगाव पोलिसांनी वाहनासह केले जेरबंद!
खान्देश

रस्त्या लुट करणाऱ्या आरोपींना धरणगाव पोलिसांनी वाहनासह केले जेरबंद!

November 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group