जळगाव, दि.२१ – कंत्राटी भरतीचा निर्णय तात्कालिन महाविकास आघाडी सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने शनिवारी शहरातील टॉवर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे (राजुमामा), ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, विशाल त्रिपाठी, माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, महानगर, अमित भाटिया, ज्योती निंभोरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा वर्मा यांच्यासह भाजप जळगाव जिल्हा महानगरचे सर्व प्रदेश, जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते