जळगाव, दि.२१ – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे आज शनिवारी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भुलाबाई महोत्सवानिमित्त गरबा रास दांडिया खेळण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत या उत्सवात भाग घेतला.
भुलाबाई महोत्सव उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सदर कार्यक्रमांमध्ये भुलाबाईचे पारंपरिक गीत व मंगळागौरची गीत सादर करण्यात आले. यावेळी शाळेतील बालगोपालांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.
दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.