• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘विद्याधर गीतरंग’ मध्ये जळगावकर रसिक चिंब

प्रख्यात संगीत नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कार्यक्रम संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 9, 2023
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
‘विद्याधर गीतरंग’ मध्ये जळगावकर रसिक चिंब

जळगाव, दि.०९ – भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्याने प्रख्यात संगीत नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व मुंबईच्या विद्याधर गोखले नाट्य संगीत प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विद्याधर गीतरंग या कार्यक्रमाचे आयोजन जळगातील कांताई सभागृहात करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन जळगाव जिल्ह्याचे प्रांत महेश सुधळकर, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, डॉ. राजेंद्र फडके, उद्योजक किरण बेंडाळे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर मान्यवर आणि कलावंतांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात ज्ञानेश पेंढारकर, नीलाक्षी पेंढारकर, प्राजक्ता जोशी व निमिश कैकाडी यांचा सहभाग होता. तर साथसंगत धनंजय पुराणिक (तबला) व वरद सोहनी (ऑर्गन) यांनी केली. कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन शुभदा दादरकर यांचे होते.

कार्यक्रमाची सुरुवात “सप्तसूर झंकारती बोले” या जय जय गौरीशंकर नाटकातील नांदी ने झाली. त्यानंतर ज्ञानेश पेंढारकरांनी जय जय गौरीशंकर नाटकातील “रमा रमण श्रीरंग” हे वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले पद गायले त्यानंतर पंडित राज जगन्नाथ नाटकातील “मदनाची मंजिरी साजिरी” हे नाट्यपद सादर केले संगीतभूषण पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेले मंदार माला नाटकातील “कोण असशील तू न कळे” हे पद सादर केले त्यानंतर नीलाक्षी पेंढारकर यांनी पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेले मंदार माला नाटकातील “सोहम हर डमरू बाजे” तसेच मदनाची मंजिरी नाटकातील प्रभाकर भालेकरांनी संगीतबद्ध केलेले “अंग अंग तव अनंग” व “ये मौसम है रंगीत” या नाट्यपदाने तर कहरच केला.

“रती हुनी सुंदर मदनमंजिरी” “हरे मनात सुंदरा तुझीच मूर्ती शामला” ही दोन नाट्यपदे सादर करून मैफिलीत रंग भरले. ही नाट्यपद सादर करून डॉकटर मधला कलाकार तमाम जळगावकर रसिकांना दाखवून दिला. विद्याधर गीतरंग या कार्यक्रमाची सांगता बावनखणी नाटकातील पंडित यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेली रचना सर्व कलावंतांनी मिळून सामूहिक रित्या गायली आणि ती रचना होती “होलीकोत्सव गीताची”. या गीताने विद्याधर गीत रंग सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमास तितकीच दमदार साथ धनंजय पुराणिक व तरुण आश्वासक कलावंत वरद सोहनी यांनी केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक चांदोरकर यांनी तर सूत्रसंचालन दीपिका चांदोरकर यांनी केले.

Next Post
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये दहा दिवस गणितासाठी उपक्रम

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये दहा दिवस गणितासाठी उपक्रम

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add