• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दहाड स्मृती क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, पहिल्या दिवशी स्वराज रेडियन्स, गोल्डन इलेव्हन संघ विजेते

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 7, 2023
in क्रिडा
0
दहाड स्मृती क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, पहिल्या दिवशी स्वराज रेडियन्स, गोल्डन इलेव्हन संघ विजेते

जळगाव, दि. ०७ – जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दुसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी स्पर्धेला शुक्रवारपासून अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरुवात झाली. सकाळी साडेआठ वाजता मैदानावर अशोक दहाड, चंद्रेश दहाड, एसटी खैरनार, अरविंद देशपांडे, अविनाश लाठी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन अशोक दहाड व चंद्रेश दहाड यांच्या हस्ते करण्यात आले.

पहिला सामना तांदळे अकॅडमी आणि स्वराज रेडियन्स ब्ल्यू या दोन संघादरम्यान खेळण्यात आला. त्याची नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस टी करणार यांच्या हस्ते करण्यात आले. तांदळे अकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय केला. त्यांचा संघ १६ व्या षटकात सर्व बाद ६६ धावावर बाद झाला. त्यात हर्षल पाटील याने १२ धावा तर भूषण वाडेकर यांनी १० धावांचे योगदान दिले. तर स्वराज रेडिएन्स ब्लू संघातर्फे शेख साद याने ३ षटकात ४ धावात ४ बळी मिळविले व इतर गोलंदाजांनी प्रत्येकी १ बळी मिळविले.

६७ धावांचे सोपे लक्ष्य घेणाऱ्या स्वराज रेडियन्स ब्लू संघाने हे लक्ष केवळ एक गडी गमावून सातव्या षटकात पूर्ण केले. त्यात विशाल शिरसाट ३० धावा तर कुणाल पवार याने २१ धावांचे योगदान देऊन आपल्या संघाला नऊ गडी राखून विजय मिळवून दिला. स्वराज्य रेडियन्स ब्ल्यू संघाचा ४ गडी पटकावणारा शेख साद याला टॅलेंट सर्च अकॅडमी प्रायोजित सामनावीराचे पारितोषिक टॅलेंट सर्च अकॅडमी चे पंकज महाजन यांच्या हस्ते देण्यात आले.

दुसरा सामना गोल्डन इलेव्हन विरुद्ध नायक क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान खेळला गेला . गोल्डन इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ गडी बाद १८४ धावा केले. प्रतिउत्तरात नायक क्रिकेट क्लब संघ १९ षटकात सर्व गडी बाद ११७ धावा केले. हा सामना गोल्डन इलेव्हन संघाने ५७ धावांनी जिंकला. या सामन्यात तीन षटकात १९ धावा देऊन ४ गडी बाद करणारा गोलंदाज हेमंत बहेरे सामनावीर ठरला.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थांना मोफत गणवेश वाटप

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थांना मोफत गणवेश वाटप

ताज्या बातम्या

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 
क्रिडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 5, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add