जळगाव, दि.०५ – जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १४ वर्ष वयोगटाखालील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव तालुक्यातील चार शाळांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवित जळगाव ग्रामीण संघाचे प्रतिनिधीत्व अनुभूती स्कूलचा संघ करेल.
अनुभूती स्कूलच्या क्रिकेटच्या ग्राऊंडवर झालेल्या पाच षटकांचा सामन्यात अनुभूतीने किड्स गुरूकुल शाळेच्या संघाला १० विकेट ने पराजित करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूल व अनुभूती स्कूल यांच्यात अंतिम सामना ३ ऑक्टोबर ला खेळविला गेला. अनुभूतीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रूस्तमजी स्कूलने निर्धारित ५ षटकात ४ विकेटच्या मोबदल्यात १९ धावा केल्यात. यावेळी अनुभूती स्कूलतर्फे अन्मय जैन याने १ षटकात ३ धावा देत २ विकेट घेतल्या. तर जिनांग जैन व रणविर गुंडपाटील प्रत्येकी १ विकेट घेतल्यात. अनुभूतीने निर्धारित षटकांत २० धावा एक विकेटच्या मोबदल्यात पुर्ण करून नऊ विकेटने सामना जिंकला. या विजयानंतर अमळनेर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी अनुभूती स्कूल जळगाव ग्रामीणचे प्रतिनिधीत्त्व करेल.
क्रिकेट प्रशिक्षक तन्वीर अहमद यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. अनुभूती स्कूलचे स्पोर्टस समन्वयक म्हणून डॉ. दिपकसिंग बिष्ट यांनी काम पाहिले. यशस्वी खेळाडूंचे अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबासीस दास यांनी कौतूक केले आहे.