• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहरलेल्या शेतीत मला भवरलाल जैन व ना. धों. महानोर दिसतात.. – शरद पवार

महानोर यांना 'हा कंठ दाटूनी आला' या स्वरांजली कार्यक्रमातून श्रद्धांजली अर्पण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 10, 2023
in जळगाव जिल्हा
0
बहरलेल्या शेतीत मला भवरलाल जैन व ना. धों. महानोर दिसतात.. – शरद पवार

मुंबई, दि.१० – महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मी वेगवेगळ्या भागात गाडीने फिरत असतो आणि आजूबाजूची बहरलेली शेती बघतो तेव्हा मला त्या हिरव्यागार बहरलेल्या शेताकडे बघताना भवरलाल जैन व ना. धों. महानोर या माझ्या दोन मित्रांची आठवण येते असे वक्तव्य महानोर यांच्या श्रद्धांजलीपर आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महानोर यांना गीते आणि कवितांतून श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या ‘हा कंठ दाटूनी आला’ या स्वरांजली कार्यक्रमात खासदार शरद पवार हे अध्यक्षस्थानी होते. आपल्या मनोगत बोलताना शरद पवार यांनी ना. धों. महानोर यांच्यासोबतच्या आठवणी तसेच सहा दशकांच्या आपल्या ऋणानुबंधाची आठवण नमूद केली.

याप्रसंगी त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने महाराष्ट्राच्या सहा विभागांमधील कवींना ना. धों. महानोर यांच्या नावाने दरवर्षी ५० हजार रुपये रकमेचा पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा सुद्धा केली. तसेच दरवर्षी १६ सप्टेंबर या महानोर यांच्या जन्मदिनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुंबई मध्ये मोठा सांगितिक कार्यक्रम घेण्याचं त्यांनी जाहीर केलं.

याप्रसंगी मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अभिनेते सयाजी शिंदे, जितेंद्र जोशी, अजित भुरे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, अभिनेते मंगेश सातपुते आणि हर्षल पाटील यांनी कविता सादर केल्या. याप्रसंगी कार्यक्रमाची भूमिका आणि प्रास्ताविक खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली तसेच महानोर कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय यांच्याशी असलेला सहा दशकांचा ऋणानुबंध विशद केला.

या कार्यक्रमात महानोर यांची गाणी व आठवणी सर्वच मान्यवरांनी उलगडून सांगितल्या. महानोर नावाचा कवी हा मराठीतला सर्वश्रेष्ठ कवी असून त्यांच्या साहित्याची भूमिका, वेगवेगळ्या आठवणींच्या रूपातून सांगीतिक पद्धतीने परिवर्तनाच्या कलावंतांनी सादर केल्या. या कार्यक्रमात श्रद्धा पुराणीक कुलकर्णी, ऐश्वर्या परदेशी, अक्षय गजभिये यांनी गाणी सादर केली. तसेच रंगकर्मी शंभू पाटील यांनी ना. धों. महानोर यांच्या साहित्यातील तसेच शेती विषयक कामातून महानोर यांच्या अनेक गोष्टी रसिकांसमोर मांडल्या.

याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी त्यांना आवडणाऱ्या दोन कविता सादर केल्या. याप्रसंगी महानोर कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची होती तर साथसंगत भूषण गुरव, संजय सोनवणे आणि रोहित बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या निर्मितीमध्ये सोनाली पाटील, अक्षय नेहे, अजय पाटील, कृष्णा पाटील यांचा सहभाग होता. कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचे दत्ता बाळसराफ व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहाय्य लाभले.

 


 

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात बैलपोळा सण उत्साहात साजरा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात बैलपोळा सण उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार
जळगाव जिल्हा

प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार

October 5, 2026
जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप
जळगाव जिल्हा

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप

October 5, 2026
५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Uncategorized

५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

October 5, 2026
एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड
गुन्हे

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

October 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

October 5, 2026
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
खान्देश

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add