जळगाव, दि.१३ – भारत हा शेतीप्रधान देश असून शेतीसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे ते दैवत मानले जाते. शेतकरी आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम करतो. बैलपोळा सण साजरा करून त्याच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त़ करतो.
ग्रामीण भागामध्ये हा सण मोठ्या उत्साह मध्ये साजरा केला जातो. परंतु शहरी भागातील मुलांना या सणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. शहरी भागातील शाळेतील मुलांना बैलपोळा सणाविषयी माहिती व आपल्या भारतीय परंपरेची ओळख व्हावी. यासाठी बुधवारी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मातीच्या बैलांचे पूजन व बैलांच्या साजचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्यासह विद्यार्थ्यांच्या हस्ते करून पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
बैलपोळा विषयीची माहिती शाळेतील उपशिक्षिका सेजल राजू बोंडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. सूत्रसंचालन शितल हेमराज शेजवळ यांनी केले. शाळेत शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याने शाळेच्या नावलौकिक भर पडत आहे.