• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘जीएमसी’चे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांची विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

राज्यपालांनी केली शिफारस, निवडीचे पत्र प्राप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 8, 2023
in जळगाव जिल्हा
0
‘जीएमसी’चे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांची विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

जळगाव, दि.०८- राज्याचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती यांनी राज्यभरातील एकूण ६ जणांची अधिसभेच्या (सिनेट) सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश विठ्ठलराव ठाकूर यांची देखील अधिसभा (सिनेट) सदस्यपदी निवड झाली आहे. याबाबतचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

डॉ. गिरीश ठाकूर यांनी अंबेजोगाईचे स्वामी रामानंदतीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून कान-नाक-घसा शास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तर त्यांनी नंदुरबार, लातूर, रायगडनंतर जळगाव येथे अधिष्ठातापदाची धुरा सांभाळली आहे. उत्कृष्ट प्रशासक, शिस्तबद्ध कारभार करण्यासाठी म्हणून ते ओळखले जातात.

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. गिरीश ठाकूर यांची २८ नोव्हेंबर २०२२ रोजी नियुक्ती झाली होती. गेल्या ८ महिन्यांपासून ते यशस्वीपणे जळगाव जीएमसीचा कारभार पाहत आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सहा सदस्यांमध्ये जळगावचे डॉ. गिरीश ठाकूर यांच्याशिवाय पुणे येथील डॉ. पराग संचेती, डॉ. हेमलता जळगावकर, नाशिक येथील डॉ. चेतना गोरीवाले, डॉ. मीनल मोहगावकर, डॉ. अभय कुलकर्णी यांचा समावेश आहे.

Tags: अधिष्ठाताडॉ. गिरीश ठाकूर
Next Post
पत्रकाराला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण

पत्रकाराला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add