• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खा. शरद पवारांचा हात डॉ.उल्हास पाटलांच्या हातात ; राजकीय चर्चांना उधाण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 17, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
खा. शरद पवारांचा हात डॉ.उल्हास पाटलांच्या हातात ; राजकीय चर्चांना उधाण

जळगाव, दि.१७ – राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस जळगाव दौर्‍यावर होते. काल जळगाव येथे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील यांच्या निवासस्थानी खासदार शरद पवार यांची काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. यावेळी खासदार शरद पवार आणि डॉ.उल्हास पाटील यांचे हात एकमेकांच्या हातात काही वेळ राहिले होते. आगामी लोकसभा निवडणूकांच्या दृष्टीने हे राजकीय हस्तांदोलन चर्चेचा विषय ठरले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी दोन दिवसाच्या जळगाव दौर्‍यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते विविध पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी संवाद साधला. शुक्रवारी दुपारी ४ वाजता खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड रविंद्र पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. खा.शरद पवारांना भेटण्यासाठी याठिकाणी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती.

तब्बल चार वर्षानंतर खा.पवार अन डॉ.पाटील यांची भेट..
खासदार शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांची तब्बल चार वर्षानंतर एकत्रित भेट झाली. या भेटीत खा.शरद पवार यांनी ‘डॉक्टर काय सुरु आहे’ अशी विचारपूस केली. तसेच त्यांनी तयारी सुरु ठेवा असा सूचक सल्‍ला देखील डॉ.उल्हास पाटील यांना दिला. याप्रसंगी खा.शरद पवार यांचा हात डॉ.उल्हास पाटील यांच्या हातात हात होता. तसेच खासदार शरद पवार आणि डॉ.उल्हास पाटील या दोघांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य होते.

खा.पवारांनी दिलेला सूचक सल्‍ला आणि राजकीय हस्तांदोलनाने उपस्थीतांच्या भुवया उंचावल्या. तसेच यावेळी उपस्थीत नेत्यांमध्ये हास्याचे फवारे देखील उडाले. सन २०१९ मध्ये डॉ.उल्हास पाटील यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र डॉ.उल्हास पाटील यांनी नम्रपणे त्यास नकार दिला होता. हे सारे असले तरी आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडणूकांच्या दृष्टीने खा.शरद पवार आणि डॉ.उल्हास पाटील यांच्या राजकीय हस्तांदोलनाची जिल्हाभरात चर्चा रंगली होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार हे उपस्थीत होते.

Next Post
Aadhaar-PAN Link: पॅन कार्ड आधारशी लवकर लिंक करा नाहीतर मिळणार नाही ITR रिफंड

Aadhaar-PAN Link: पॅन कार्ड आधारशी लवकर लिंक करा नाहीतर मिळणार नाही ITR रिफंड

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add