• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ सुरू

खा. उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 11, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ सुरू

जळगाव, दि.११ – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ चे उद्घाटन शुक्रवारी खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

या स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येत आहेत या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश आहे.

या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९० खेळाडूंचा सहभाग आहे. खा. उन्मेष पाटील यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव विनीत जोशी यांनी केले.

या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व प्रशिक्षक किशोर सिंह आणि सहकारी जाजीब शेख, गीता पंडित, करण पाटील, रोनक चांडक, तेजम केशव, अतुल ठाकूर, आयशा खान, तसेच स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शहा व पंच म्हणून देवेंद्र कोळी, भुषण पाटील, योगेश टोंगले, दर्शन गवळी यांनी काम पाहिले.

Next Post
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे.. आ.सुरेश भोळे

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे.. आ.सुरेश भोळे

ताज्या बातम्या

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

July 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add