जळगाव, दि.१५ – जैन स्पोर्टस् अॅकडमीतर्फे १६ एप्रिल ते १४ मे दरम्यान ‘समर कॅम्प-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप समारंभ विद्या इंग्लीश मिडीअम स्कूलच्यामागे असलेल्या क्रीडांगणावर झाला. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा क्रीडा साहित्य व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधिक्षक व्ही. एन. तायडे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गादिया, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. अश्विन झाला, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.
उन्हाळी प्रशिक्षणाचा आढावा मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल यांनी सांगितला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले. आभार अजित घारगे यांनी मानले. बॅडमेंटनचे सहप्रशिक्षक गीता पंडीत यांनी मनोगत व्यक्त केले.
जैन स्पोर्टस अॅकडमीतर्फे विविध क्रीडाप्रकारांमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक व खेळाडूंचा गौरव करण्यात आला. दरम्यान जैन स्पोर्टस् अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वाच्च समितीत निवडून आल्याने त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
उन्हाळी प्रशिक्षण शिबीरामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या सर्व खेळाडूंचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिबीर यशस्वीतेसाठी अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, सुयश बुरकूल, मुश्ताक अली, वरूण देशपांडे, राहुल निभोंरे, घनशाम चौधरी, उदय सोनवणे यांनी सहकार्य केले.