• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 26, 2023
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

जळगाव, दि.२६ – एरंडोल तालुक्यातील श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकतेच राज्यशासनाकडून ‘ब’  दर्जा प्राप्त झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मराठी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी (दि.२३ मार्च) झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहिर करण्यात आला आहे.

श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते. खान्देशासह महाराष्ट्राभरातून भाविकभक्त याठिकाणी श्रद्धेने येत असतात. शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्री क्षेत्र पद्मालय देवस्थानाला ‘ब’ दर्जा द्यावा यासाठी अनेक वर्षांपासून भाविकांसह परिसरातील नागरीकांची मागणी होती. जिल्ह्याच्यादृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या पद्मालय देवस्थानाचा विकास तीर्थस्थळाच्या ‘ब’ दर्जामुळे करता येईल.

पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये एक आहे. हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानीत आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत. एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या दोघी सोंडेची गणपती मुर्ती विराजीत असून, जगातील हे एकमेव असे मंदिर आहे. पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाफ आहे. ज्या संस्कृतमध्ये कमळाचे घर असा अर्थ आहे. या मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो. त्यामुळे मंदिराला पद्मालय असे म्हटले जाते.

येथील तलावात सप्तरंगी कमळ आहेत. हे मंदिर पुरातन असून मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची रचना हेमाडपंथी आहे. मंदिरात एकाच व्यासपीठावर डाव्या उजव्या सोंडेचे गणपती आहे. जगात केवळ पद्मालय येथे श्रींच्या दोन मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत. हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे.

सद्गुरू गोविंद शास्त्री महाराज बर्वे यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाली होती. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला असून, गणेश पूराणात या गणपती मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. काशी विश्वेश्वर येथील शंकराच्या मंदिराच्या प्रतिकृती प्रमाणे या मंदिराची निर्मीती असल्याचेही सांगण्यात येते. येथे ४४० कि.ग्रा. वजनाचा एक भला मोठा घंटा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे जाते आहे. याच परिसरात भिमकुंडही आहे.

सदर देवस्थानास ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू होते. आणि त्यास अखेर यश आले. याकामी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन, एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने मंदिराला ‘ब’ दर्जा प्राप्त होण्यास अत्यंत मोलाचा वाटा व सहभाग आहे, ‘ब’ दर्जा प्राप्त होण्यासाठी आवश्यक ती पुर्तता करण्यासाठी ग्रीन स्टोन इंजिनीअरींगच्या आर. एस. महाजन यांनी परिश्रम घेतले.

▪️अनेक वर्षांपासून श्री. गणपती मंदिर देवस्थान पद्मालयला ‘ब’ दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. ही आनंददायी बाब असून आता लवकरच या परिसरात नियोजीत असलेल्या कामांना वेग देऊन ती पुर्ण होतील व मंदिर आणि परिसराचा विकास होईल. यामुळे या ऐतिहासीक देवस्थानाचा विकास होऊन येणाऱ्या भारतवर्षात या देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होईल अशी खात्री आहे.
अशोक जैन, अध्यक्ष, श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय


 

Next Post
आयुर्वेद उपचार विश्वसनीय आणि परिणामकारक – डॉ. हेमकांत बाविस्कर

आयुर्वेद उपचार विश्वसनीय आणि परिणामकारक - डॉ. हेमकांत बाविस्कर

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group