• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आयुर्वेद उपचार विश्वसनीय आणि परिणामकारक – डॉ. हेमकांत बाविस्कर

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात डॉ. हेमकांत बाविस्कर यांची 'राष्ट्रीय आयुर्वेद गुरु' पदी नियुक्ती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 27, 2023
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
आयुर्वेद उपचार विश्वसनीय आणि परिणामकारक – डॉ. हेमकांत बाविस्कर

जळगाव, दि.२७ – राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाशी संबंधित असलेले डॉ. हेमकांत ऊर्फ हेमंत शिवाजीराव बाविस्कर हे देशातील तीन नेत्रतज्ज्ञ पैकी एक ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत. महाराष्ट्रासह जळगावसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. गत १७ फेब्रुवारी रोजी त्यांना विद्यापीठाने ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ म्हणून नियुक्त केले आहे. दरम्यान या संदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी जळगावत पत्रकार परिषद घेण्यात आली.

डॉ. बाविस्कर हे गेल्या २६ वर्षांपासून आयुर्वेदातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः डोळ्यांच्या विकारांवर यशस्वीरित्या उपचार करीत आहेत. त्यांनी सांगितले की, डोळ्यांशी निगडित आजार, डोळ्यांवर होणाऱ्या परिणामांवर ते आयुर्वेदाच्या माध्यमातून यशस्वी उपचार करत आहेत. त्यांच्या मते, आयटी क्षेत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या वाढत्या वापरामुळे ड्राय आय सिंड्रोमची समस्या सर्वदूर होत आहे. ज्यावर आयुर्वेद चिकित्सा पद्धतीद्वारे औषधोपचार करता येतो.

भारत सरकारकडून दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद गुरुरूंची निवड केली जाते. त्याअंतर्गत यावर्षीही निवडप्रक्रियेत राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात डॉ. बाविस्कर यानी केलेल्या अर्जानुसार राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ संचालक समितीतर्फे डॉ. गुप्ता व डॉ. हरिष सिंग यांनी जळगावात येऊन त्यांचे वैद्यकीय कार्य, आयुर्वेदातील संशोधन व आयुर्वेदासाठी असेलेली सामाजिक जाणीव लक्षात घेऊन त्यांना नामनिर्देशित करुन आर. ए. व्ही. मार्फत त्यांची नियुक्ती केली.

वर्ष २०२२-२३ या वर्षासाठी, देशातील तीन निवडक ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु पैकी दोन केरळ राज्यातील आहेत ज्यांच्या अंतर्गत ८ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे आणि महाराष्ट्रातील जळगाव येथील डॉ. हेमकांत बाविस्कर हे एकमेव नामांकित ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु आहेत ज्यांच्या अंतर्गत २ निवडक विद्यार्थ्यांना परिविक्षेसाठी पाठविण्यात आले आहे.

अॅलोपॅथी उपचारांसाठी ज्या पद्धतीने शासकीय अनुदान सुविधा उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे आयुर्वेदातही व्हायला हवे यासाठीसुद्धा डॉ. बाविस्कर प्रयत्नशील आहेत. ते म्हणतात, त्यांना जळगावला आयुर्वेदात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित करायचे आहे. यासोबतच दिल्ली आणि गोवा व्यतिरिक्त जळगाव येथेही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (एआयआयए) स्थापन व्हावे, असे डॉ. बाविस्कर यांचे मत आहे. ते यासाठी प्रयत्नशील तर आहेतच, पण आयुर्वेदावरील संशोधन सुरु ठेवून त्याच्या प्रचारासाठी ते सदैव समर्पित असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

VIDEO

Next Post
दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add