जळगाव, दि. १५ – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची गौरव संपन्न १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप शुक्रवारी संध्याकाळी पार पडला. समारोप प्रसंगी जेष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, चंद्रकांत चौधरी, पियुष रावळ, संजय निकुंभ व परिक्षक डॉ. सिद्धार्थ मस्के, शलेंद्र खंडागळे, राधिका देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
शहरातील छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे १० जानेवारी पासून स्पर्धेस सुरुवात झाली होती चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण १९ बालनाट्य सादर झाले, त्यात जळगाव, नंदुरबार, इंदोर, वरणगाव, भुसावळ, सारंगखेडा, येथून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
मनोगत व्यक्त करताना जेष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील म्हणाले की सतत १९ वर्ष स्पर्धा होत आहे, महाराष्ट्र शासनाची बाल राज्य नाट्यस्पर्धा सांस्कृतिक चळवळी ला समृद्ध व प्रगल्भ करणारी आहे. या वेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगकर्मी होनाजी चव्हाण यांनी केले तर आभार समन्वयक भूषण वले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेमकुमार बडगुजर, सुनील राजपूत, धनराज सानप जय सोनार यांनी परिश्रम घेतले.